…तर ‘लाडकी बहीण योजना होईल बंद’, अस का म्हणाले पंतप्रधान मोदी? Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
PM Narendra Modi Majhi Ladki Bahin Yojana Statement

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्रातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजनेंतर्गत दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते. पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहिन योजनेची रक्कम 1,500 वरून 2,100 रुपये करू, असे आश्वासन महायुतीने दिले आहे. (PM Modi’s recent statement on Majhi Ladki Bahin Yojana raises concerns as he warns of the scheme’s possible discontinuation if MVA gains power. Find out what he said about the future of this popular scheme for women in Maharashtra).

PM Narendra Modi Majhi Ladki Bahin Yojana Statement : महाराष्ट्रात या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, काल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडकी बहिन योजनेबाबत मोठे वक्तव्य केले.

Majhi Ladki Bahin Yojana 2100 RS November Update
🔴 ही बातमी वाचली का?🤞

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी महायुतीच्या समर्थनार्थ धुळ्यात पहिली सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर (MVA) हल्लाबोल केला. एमव्हीए सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, असे ते म्हणाले.

धुळे येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, “विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी आपल्या बहिणी आणि मुलींचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना सशक्त करणे खूप महत्त्वाचे आहे.  गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून मोठे निर्णय घेतले आहेत. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चा होत आहे, मात्र ती रोखण्यासाठी विरोधी पक्ष विविध कारस्थान रचत आहेत.

ते पुढे म्हणाले, आमचे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी जी पावले उचलत आहे ती त्यांच्या आघाडीला सहन होत नाहीत. महायुती सरकारच्या माझी लाडकी बहिन योजनेची किती चर्चा आहे हे तुम्हाला माहीत आहे.  पण महाविकास आघाडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना बंद करण्याचा कट रचत आहे. जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल अस मोदी म्हणाले.

WhatsApp Group Join Now

आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article