Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जवळ आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची चर्चा चांगलीच रंगली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. सध्या राज्यातील 2 कोटी 34 लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आचारसंहिता सुरु होणार असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Amruta Fadnavis’s viral post about ‘Majhi Ladki Bahin Yojana’ ahead of Maharashtra elections emphasises the scheme’s emotional bond. Know what she shared on social media!).
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. सध्या राज्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून. निवडणुकीचा निकाला लागताच या योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यानंतर या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या लवकरच 3 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Amruta Fadnavis Viral Post Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही केवळ एक योजना नसून आपल्या सर्व बहिणींच्या आर्थिक सन्मानाला जपणारी भावाकडून बहिणीला रक्षाबंधनला दिलेली प्रेमाची ओवाळणी आहे. रक्षाबंधनला मी महिला मेळाव्यात, शिक्षक सहकारी बँक सभागृहात आपल्या भावाला कायम साथ देण्याच मी आपल्याला आवाहन केल होत, आणि आता भाऊबीजेलासुद्धा तेच सांगते की सर्व लाडक्या बहिणींच्या प्रेमाचा ठेवा मायेची थाप देवेंद्रजींच्या पाठीवर असू द्या. आणी मला खात्री आहे की आपण सर्व बहिणी भावाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहू! अमृता फडणवीस यांनी पोस्टमध्ये अस म्हणल आहे.