Gold Price Today 2 November 2024: आज दिवाळी पाडवा असून आजच्या दिवशी देशात सोने स्वस्त झाले आहे. आज देशभरात गोवर्धन उत्सव, दीपावली पाडवा साजरा केला जात आहे. दिवाळीत साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी सोन्याचा दर कमी झाला आहे. आज देशात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 500 रुपयांनी कमी झाला आहे. (On Diwali Padwa, gold prices drop by ₹500. Today, November 2, 2024, 24-carat gold is priced at ₹80,600 and 22-carat gold at ₹73,800 across major cities in India).
Gold Rate Today : दीपावली पाडव्याच्या दिवशी सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. सोन्याचा आजचा भाव, 2 नोव्हेंबर 2024 रोजी सोने स्वस्त झाले आहे. आज देशभरात गोवर्धन उत्सव, दीपावली पाडवा साजरा केला जात आहे. दिवाळीनंतर साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी सोन्याचा दर 500 रुपयांनी कमी झाला आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 80,600 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 73,800 रुपये आहे. त्याचबरोबर आज चांदीही स्वस्त झाली असून आज चांदी 96,900 रुपये प्रतिकिलो आहे.
सोन्याचा भाव आज 2 नोव्हेंबर 2024
शहर | 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (₹) | 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (₹) |
---|---|---|
दिल्ली | 73,990 | 80,700 |
मुंबई | 73,840 | 80,550 |
हैदराबाद | 73,840 | 80,550 |
अहमदाबाद | 73,890 | 80,600 |
चेन्नई | 73,840 | 80,550 |
कोलकाता | 73,840 | 80,550 |
जयपूर | 73,990 | 80,700 |
लखनौ | 73,990 | 80,700 |
बंगळुरू | 73,840 | 80,550 |
पाटणा | 73,890 | 80,600 |