Majhi Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना सध्या दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. महायुतीकडून सध्याचा हफ्ता वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा केली असताना, अशातच आता महाविकास आघाडी कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातून लाडक्या बहिणींना दरमहा 3000 रुपये देण्यात येणार असल्याच जाहीर करण्यात आल आहे. (Majhi Ladki Bahin Yojana’s December installment for eligible women to be disbursed by month-end. Will the amount be Rs. 1500, 2100, or 3000? Election results to decide)
माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून प्रचंड उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा करून लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana December Installment Announcement : दरम्यान, 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीसच देण्यात येणार आहेत, अस मोठ विधान एकनाथ शिंदे यांनी केल आहे.
🔴 व्हायरल 👉 लाडकी बहीण योजना होईल बंद’, अस का म्हणाले पंतप्रधान मोदी?.
त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा होणार हे निश्चित झाल असाल तरी, लाडक्या बहिनींच्या खात्यात नेमके 1500 रुपये, 2100 की 3000 रुपये जमा होतील? ते या निवडणुकीचा निकालच ठरवेल.
🔴 हेही वाचा 👉 आता लाडक्या बहिणींना मोफत एसटी प्रवास, दर महिन्याला 2100 नाहीतर 3000, जाहीरनाम्यातून.