लवकरच मिळणार लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदें Majhi Ladki Bahin Yojana Latest News

3 Min Read
{"remix_dataMajhi Ladki Bahin Yojana December Installment Date Eknath Shinde"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":2,"transform":1,"effects":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै ते नोव्हेंबर महिन्यांचे हफ्ते जमा करण्यात आले असून डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देणार असल्याची माहिती देण्यात आली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी लाडकी बहीण योजनचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता डिसेंबरपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries to receive December installment early, as announced by CM Eknath Shinde amidst election period. Scheme promises continued support for women).

Majhi Ladki Bahin Yojana December Installment Date Eknath Shinde : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरु असल्याने सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आला आहे. त्यामुळेच ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर दोन महिन्यांचे पैसे एकत्रच जमा करण्यात आले होते. आता लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्यांचे पैसे कधी जमा होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हफ्त्याबाबत राज्यातील महिलांना आश्वासित केल आहे.

Majhi Ladki Bahin Yojana 2100 RS November Update
🔴 ही बातमी वाचली का?🤞

जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. यानुसार या योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत. आता निवडणुका जवळ आल्याने या योजनेचा निधी थांबवण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणुका संपलाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार की नाही? पुढचा हफ्ता कधी मिळणार? अशी चर्चा रंगली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना आश्वासित केल आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेमुळे अडकु नयेत म्हणून महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबरमध्येच देण्यात आले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळे निकाल लागताच डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबरमध्येच जमा करण्यात येणार आहेत. कारण आमची नियत स्वच्छ आहे. आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही. अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना याच महिन्याच्या ‘या’ तारखेला मिळणार डिसेंबरचा हफ्ता, किती रुपये?.

WhatsApp Group Join Now

आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article