Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin) योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात 5500 रुपये आणी 2500 रुपये दिवाळी बोनस जमा होणार असल्याचे वृत्त होते. त्याच काय झाल? किती महिलांच्या बँक खात्यात दिवाळी बोनसचे पैसे जमा झाले? त्याबद्दल जाणून घेऊयात… (Get the latest update on the Majhi Ladki Bahin Yojana Diwali bonus. Find out if eligible women will receive the rumored bonus and the official government clarification). (Get the latest update on the Majhi Ladki Bahin Yojana Diwali bonus. Find out if eligible women received the rumoured 5500 INR bonus, and learn the official government stance on it).
Majhi Ladki Bahin Yojana Latest News : राज्यात जुलै महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटी 34 लाख महिला पात्र ठरल्या असून 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. तर सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावार माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या बातमीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना 5500 रुपये आणी 2500 रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आम्ही याआधीच सांगितल्या प्रमाणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दिवाळी बोनस देणार असल्याची कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आली न्हवती. लाडकी बहीण योजना दिवाळी बोनसबाबत कोणतीही अधिकृत माहिती महाराष्ट्र शासन तथा महिला व बालकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आली न्हवती. Majhi Ladki Bahin Yojana Fake News Alert : माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस मिळणार असल्याची बातमी पूर्णपणे खोटी होती. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असे आवाहन यापूर्वीच केले आहे.