Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मध्य प्रदेशातील लाडली बहन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात 1 जुलैपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना’ सुरू करण्यात आली आहे. (Diwali gift for Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries! Deputy CM Ajit Pawar announced continued support, with 2.34 crore women already benefiting from the scheme).
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीच्या हालचाली तीव्र झाल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतच्या चर्चा रंगात आहेत. पक्ष आणि विरोधी पक्षातील नेते सातत्याने या योजनेबाबत वक्तव्ये करून या चर्चाना खतपाणी घालत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहिन योजनेबाबत पुन्हा एकदा वक्तव्य करत या योजनेबाबतची महत्त्वाची माहिती दिली आहे.
पुणे येथील सांगवी येथे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजनेसाठीची पुढील पाच वर्षांच्या खर्चाची तरतूद आम्ही केली आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. विरोधी पक्ष लाभार्थी महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळाला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, “जेव्हा कुणाच्या घरी मनीऑर्डर येते तेव्हा पोस्टमन मनीऑर्डर घेऊन येतो. पैसे आणून दिल्याने त्याला टीप म्हणून काही पैसे मिळावेत अशी अपेक्षा असते. त्यामुळे मनीऑर्डर घेऊन आलेल्या पोस्टमनला काही तरी टीप द्यावी लागते. पण आम्ही लाडकी बहीण योजनेत कोणता मध्यस्थ ठेवलेला नाही. आम्ही थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा करत आहोत. आणी या योजनेसाठी पुढील पाच वर्षांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात गेल्या महिन्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्यांचे 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. जे या योजनेच्या ऑक्टोबरच्या चौथ्या आणि नोव्हेंबरच्या पाचव्या हप्त्याचे ऍडव्हान्स पेमेंट आहे.