आता लाडक्या बहिणींना मोफत एसटी प्रवास, दर महिन्याला 2100 नाहीतर 3000, जाहीरनाम्यातून राहुल गांधींच्या 5 मोठ्या घोषणा – Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Free ST Travel 3000 Monthly Announcement

Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today : आता लाडक्या बहिणींना मोफत एसटी प्रवास, दर महिन्याला 3000 रुपये, अशा 5 मोठ्या घोषणा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत. (Now, free ST travel and Rs. 3000 monthly for women under Majhi Ladki Bahin Yojana! Key announcements in the MVA manifesto include farmer loan waivers and healthcare benefits).

Majhi Ladki Bahin Yojana Free ST Travel 3000 Monthly Announcement : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून महाविकास आघाडीकडून 5 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana 2100 RS November Update
🔴 ही बातमी वाचली का?🤞

महाविकास आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात 5 मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून त्यानुसार आता महाराष्ट्रातील महिलांना पूर्णपणे मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना (Mazi Ladki bahin yojana) दरमहा 3000 रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्या रकमेपेक्षा लाडक्या बहिणींना 900 रुपये जास्त देण्यात येणार असल्याचे आता महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना याच महिन्याच्या ‘या’ तारखेला मिळणार डिसेंबरचा हफ्ता, किती रुपये?.

महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या 5 प्रमुख घोषणा

  • 1. महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
  • 2. नवीन योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत.
  • 3. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.
  • 4. 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
  • 5. जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना होईल बंद’, अस का म्हणाले पंतप्रधान मोदी?.

WhatsApp Group Join Now

आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article