मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Income Limit Increase

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या असणारी वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जर सध्या असणारी 2.5 लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढली तर याचा फायदा महाराष्ट्रातील करोडो महिलांना होईल. (Maharashtra CM Eknath Shinde announces an increase in the annual income limit for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana. This change could make millions of women eligible for monthly financial support. Read the latest updates on eligibility and benefit enhancements under this scheme).

Majhi Ladki Bahin Yojana Income Limit Increase : महायुती सरकारकडून राज्यातील माता-भगिनींना सक्षम करण्यासाठी त्यांना दरमहा 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना  महायुती सरकारने सुरु केली, महाराष्ट्रातील 2.5 कोटी भगिनींनी या योजनेचा लाभ घेत सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. हीच वाटचाल अधिक जोमाने करण्यासाठी आता महायुती सरकारच्या पुढील कारकीर्दीत लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जाणार आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana 2100 RS November Update
🔴 ही बातमी वाचली का?🤞

ठाणे येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या असणारी 2.5 लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा वाढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. जर सध्याची उत्पन्न मर्यादा वाढवली गेली तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांची संख्या दुपटीने वाढेल व राज्यातील करोडो महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यात येणार असून निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेसाठीची नवीन अर्ज प्रक्रिया सुरु होईल.

WhatsApp Group Join Now

आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article