Majhi Ladki Bahin Yojana Latest News : तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो पण त्याच बरोबर काही कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. (Discover which families are ineligible for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana in Maharashtra. Learn the specific criteria that disqualify women from receiving the scheme’s benefits, including family income, employment status, tax payment, and government positions).
काय आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देण्यात येते. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी सुरु झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आणी डिसेंबर महिन्यापासून नवीन अर्जप्रक्रिया सुरु झाल्यावर लाभार्थी महिलांची संख्या 3 कोटीच्या घरात जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहेत?
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येतो
- 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे
- इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेसाठी पात्र नसेल
- सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही
- सरकारी योजनेतून 1500 रुपयांपेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही
‘या’ कुटुंबातील महिलांना मिळणार नाही माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल
- सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत
- बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या मंडळाचा सदस्य असेल.